Nashik Crime : गस्तीपथकाच्या सतर्कतेमुळे चोऱ्यांचे सत्र रोखले; जळगावसह सातपूरचे संशयित ताब्यात
Nashik Police Night Patrol Nabs 12 Theft Suspects Across City : नाशिक शहराच्या विविध भागांतून चोऱ्याच्या तयारीत असलेले १२ संशयित रात्रगस्ती पथकांनी अटक केले असून, त्यांच्या जवळून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नाशिक- रविवारी (ता. २२) रात्री आयुक्तालय हद्दीतील रात्रगस्ती पथकांनी चोऱ्या-घरफोडीच्या तयारीत असलेल्या १२ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.