पतीच्या निधनानंतरही आईने वृत्तपत्र विक्री व्यवसाय सांभाळून मुलीला केले डॉक्टर

पतीच्या निधनानंतरही आईने वृत्तपत्र विक्री व्यवसाय सांभाळून मुलीला केले डॉक्टर
Published on: 
YEO26B27038 डॉ. निकिता जेजुरकर ----------------- वृत्तपत्र विक्री करत आईने मुलीला केले डॉक्टर अंदरसूल येथील नीता जेजुरकरां यशोगाथा, तिन्ही मुले झाले उच्चशिक्षित ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता.६ : पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आली, हातात वृत्तपत्रांचे गठ्ठे आणि डोळ्यांसमोर मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न...परिस्थितीशी दोन हात करत अंदरसूल येथील नीता जेजुरकर यांनी पतीचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सांभाळत तिन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. त्यांच्या याच संघर्षाला आता यशाची किनार लाभली आहे. (स्व) पंढरीनाथ जेजुरकर यांची कन्या डॉ. निकिता जेजुरकर हिने बीएचएमएस परीक्षेत यश मिळवत डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. -------------- अंदरसूल येथील वृत्तपत्र विक्रेते (स्व) पंढरीनाथ जेजुरकर यांची कन्या निकिता हिने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौथ्या वर्षात बीएचएमएस परीक्षेत ९७१ गुण मिळवत यश संपादन केले. जेजुरकर परिवारातील पहिली डॉक्टर होण्याचा मान मिळविणाऱ्या निकिताच्या यशाने आईच्या कष्टांचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. निकिताच्या या यशामागे तिची जिद्द, मेहनतीबरोबरच तिची आई नीता जेजुरकर यांचा त्याग मोलाचा ठरला. पंढरीनाथ जेजुरकर यांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नीता जेजुरकर यांच्या खांद्यावर आली. अचानक आलेल्या या संकटाने न खचता त्यांनी पतीचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय समर्थपणे सांभाळत मुलांच्या शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले. पहाटेपासून वृत्तपत्र वितरणाची धावपळ, घरची जबाबदारी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च अशा अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी तिन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. त्यांच्या मोठ्या मुलीने आयटी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, निकिताने वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे. धाकटा मुलगा आयुष्य हा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करीत आहे. १६-१ चौकट वडिलांचे स्वप्न साकारले आईच्या कष्टांची जाणीव ठेवत निकिताने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. तिच्या यशामुळे वडिलांचे स्वप्न पूर्ण होण्यासोबतच जेजुरकर कुटुंबाचेही नाव उज्ज्वल झाले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या नीता जेजुरकर यांच्या संघर्षाला आणि निकिताच्या जिद्दीला मिळालेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com