डॉ. निलेश जेजुरकर जामीनावर आज सुनावणी

डॉ. निलेश जेजुरकर जामीनावर आज सुनावणी
Published on: 
पान-३ मुख्य २०-१ डॉ. नीलेश जेजुरकरच्या जामिनावर आज सुनावणी नाशिक, ता.२७ : जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ  डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला त्यांचा पती व मुख्य संशयित डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या जामिनावर उद्या (ता.२८) सुनावणी होणार आहे. मंगळवारी (ता. २७) न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. डॉ. मनीषा यांनी मार्चमध्ये गंगापूर रोड परिसरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी डॉ. मनीषा यांची बहिण रोहिणी थोरात यांच्या तक्रारीनंतर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.२७) सरकार पक्षाने डॉ. जेजुरकर याच्या जामिनाला तीव्र विरोध करताना, ते मानसोपचार तज्ज्ञ असल्याने साक्षीदारांवर प्रभाव पाडून फितवण्याची शक्यता व्यक्त केली. बचाव पक्षाचे ॲड. अविनाश भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. जेजुरकर यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर पोलिस चौकशीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले. या दरम्यान, डॉ. जेजुरकरविरोधात फिर्यादी वा साक्षीदार यांच्याकडून एकही तक्रार पोलिसांकडे नाही. त्यांनी कोणावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. पोलिस कोठडीत पुरेशी चौकशी झाली असून, न्यायालयीन कोठडीची गरज नाही. त्यांना दोन मुली असल्याने जामीन मंजूर करावा अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com