सातपूर- ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानसेवा अधिक गतिमान व्हावी तसेच तसेच दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांसाठी उड्डाणे वाढवावीत. यांसह उद्योजकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्यस्तरावरून निश्चितच प्रयत्न करू, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी ‘निमा’च्या शिष्टमंडळाला दिले.