निमगावला जुन्या सवंगड्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

निमगावला जुन्या सवंगड्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
Published on: 
फोटो -16240 निमगाव : २३ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात एकत्र आलेले सवंगडी. ----- निमगावच्या महाविद्यालयात सवंगड्यांचा स्नेहमेळावा सकाळ वृत्तसेवा निमगाव, ता. १५ : येथील टीकेआरएच माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ मधील बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेत उत्साहात झाला. तब्बल २३ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली. या वेळी मित्रांसोबत केलेल्या खोड्या, जुन्या आठवणींना उजाळा देत हास्य विनोद झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुने सवंगडी एकत्र आले. कार्यक्रमाला तत्कालीन शिक्षकांना देखील निमंत्रित करण्यात आले. अध्यक्षस्थानी निवृत्त प्रा. एन. सी. रंगी व प्रा. रवींद्र मोरे होते. त्यांनी मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून आपले कार्य करीत राहावे. आई वडिलांची सेवा करा व शाळेला मदत करा असे आवाहन प्रा. रंगी यानी केले. देशासाठी, गावासाठी, समाजासाठी आपण कायम तत्पर राहावे. गरिबांना मदत करावी. या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यावे व आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा असे आवाहन प्रा. मोरे यांनी केले. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश महाले, योगेश बच्छाव, भरत देवरे, दीपक देवरे, संदीप सरावत, योगेश आहीरे, सचिन दैतकार, रीना साळुखे, रिंकू भालेराव, शीतल खैरनार, कविता शेवाळे, सरोज खैरनार, माधुरी हिरे, मनीषा हिरे आदींच्या पुढाकारातून माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. या वेळी सर्वांनी परिचय करून दिला. आगामी काळात मेळावा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्धार करण्यात आला. रूपाली गोलाईत यांनी प्रास्ताविक केले. सरोज खैरनार यांनी स्वागत तर शिवचरण आहिरे यांनी सूत्रसंचालन केले. वृषाली हिरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.