निनावीत कडवा जलवाहिनीचा जोड निखळला; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आव्हान

Water accumulated in fields due to dislodgement of kadwa water channel.
Water accumulated in fields due to dislodgement of kadwa water channel.esakal

सिन्नर (जि. नाशिक) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा जोड इगतपुरी तालुक्यातील निनावी गावाच्या शिवारात शुक्रवारी (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास निखळला. सदाशिव गायकवाड यांच्या शेतात योजनेचे पाणी शिरल्याने सोयाबीन व टोमॅटो पिकांचे नुकसान झाले. काम प्रगतिपथावर सुरू असून, सिन्नरमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सिन्नर नगरपालिकेने केले आहे. (ninavi aqueduct dislodged Citizens challenged to conserve water by sinnar palika nashik Latest Marathi News)

६०० मिलिमीटर व्यासाची ही मुख्य जलवाहिनी कडवा धरणापासून कोनांबे शिवारातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आली असून, इगतपुरी तालुक्यातील निनावी गावच्या शिवारात सदाशिव गायकवाड यांच्या शेतातून ही जलवाहिनी गेली आहे. अतिवृष्टीमुळे जलवाहिनीवरील भराव निघून गेल्यामुळे दोन पाईपांना जोडणारा जोड निखळला.

वीजपुरवठा खंडित असल्याने जलवाहिनीत असलेले पाणी गायकवाड यांच्या शेतात शिरले. त्यामुळे गायकवाड यांचे सोयाबीन व टोमॅटो पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती नगरपरिषदेला कळविल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला.

Water accumulated in fields due to dislodgement of kadwa water channel.
प्रवाशास लुटणाऱ्याला सश्रम कारावास; सलीम वड्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगरपरिषदेची ही पाइपलाइन वारंवार फुटून शेती पिकांचेे मोठे नुकसान होते. गेल्या आठवड्यात शिवडे येथे ही जलवाहिनी फुटली होती. या वेळी वीजपुरवठा खंडित असल्याने नुकसानीची तीव्रता कमी असली, तरी वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीसंदर्भात नगरपरिषदेने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

सोमवारी पाणीपुरवठा होण्याची शक्यता

जलवाहिनीची तत्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांनी दिली. दुरुस्तीचे काम दिवस-रात्र सुरू राहणार असून, रविवारी (ता. १८) रात्रीपर्यंत काम पूर्ण होऊन सोमवारी (ता. १९) पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी उपलब्ध पाऱ्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी संजय केदार, अभियंता दसरे यांनी केले आहे.

Water accumulated in fields due to dislodgement of kadwa water channel.
Nashik : गौण खनिजकडून ‘त्या’ 21 क्रशरला अखेर सील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com