नामपूर- गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड, सिमेंटच्या जंगलांचा विळखा, औद्योगिकीकरणामुळे वायू प्रदूषणाचा वाढलेला आलेख, दरवर्षी कोट्यवधी कागदी झाडांची होणारी लागवड, तापमानात दिवसेंदिवस होणारी वाढ आदी बाबींमुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे.