निफाड- तालुक्यातील खेडलेझुंगे, कोळगाव, रूई, कानळद, देवगाव, शिरवाडे व वाकद या गावांतील शेतकरी कालव्यांतील पाण्याच्या गळतीमुळे पुरबाधित शेती आणि नापिकीच्या समस्येला तोंड देत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. शर्मा यांनी या भागातील गावे भविष्यात पुरबाधित होणार नाहीत, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिली.