Cold Wave
sakal
चांदोरी: राज्यातील थंडीची लाट सुरू होताच निफाड तालुका पुन्हा एकदा सर्वाधिक कमी तापमान नोंदविणारा भाग ठरत आहे. काही दिवसांपासून तालुक्यातील तापमान ६ ते ९ अंशांपर्यंत खाली येत असून ‘निफाड म्हणजे थंडीची राजधानी’ अशी ओळख दृढ होताना दिसते. निफाडची बशीसारखी भौगोलिक रचना, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा नसणे आणि गोदावरी, दारणा, कादवा, विनता नदीप्रवाह तसेच नांदूरमध्यमेश्वर जलाशयाच्या उपस्थितीमुळे तालुक्यात स्वाभाविकरीत्या तीव्र गारठा निर्माण होतो. भौगोलिक रचना बशीसारखी, थंड हवा साचून राहते.