२५ जानेवारी २०२२ च्या मध्यरात्री अज्ञात वाहनातून सुमारे ४० वर्षीय युवकाचा खून करून मृतदेह करंजाळी घाटातील कोटंबी रस्त्यालगतच्या वन विभागाच्या जागेत फेकून दिला होता. २६ जानेवारीला सकाळी माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक दिवाणसिंग वसावे व पथकाने घटनास्थळ गाठले. त्यानंतर, पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.