Nashik Political: निफाडचे राजकारण वेगळ्या वळणावर! कार्यकर्त्यांची वैचारिक क्रांती दिशा ठरविणार

गेल्या पाच दशकांपासून शरद पवार हे नाव निफाड तालुक्यावर अधिराज्य गाजवत आहे, ते विनायकदादा पाटील, मालोजीराव मोगल, वसंत पवार आणि नंतरच्या काळात दिलीप बनकर यांच्या झालेल्या राजकीय उज्ज्वलतेमुळे.
AJit pawar with Dilip Bankar & Anil Kadam with Sharad Pawar
AJit pawar with Dilip Bankar & Anil Kadam with Sharad Pawaresakal

"महाविकास आघाडीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. नंतरच्या काळात राज्यात गेल्या पावणेदोन वर्षांत कमालीचे राजकीय तांडव पाहायला मिळाले. निफाड तालुक्यात त्याचे थेट पडसाद उमटले. अशातच जेव्हा शिवसेनेला (ठाकरे गट) मशाल चिन्ह मिळाले, त्या वेळी अनिल कदम यांनी ठाकरे यांच्या निष्ठेवर शिक्कामोर्तब केले; तर दोन-तीन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याकडे निवडणूक आयोगाने दिलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळाबरोबर जाण्यात दिलीप बनकर ठाम राहिले. यात शरद पवार यांच्या प्रेमापोटी हृदयस्थ भूमिका घेणाऱ्या दोन्हींचे पवार प्रेम सुटत नाही, तेच या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असलेल्या पवार निष्ठेचे गमक आहे." - सुदर्शन सारडा, ओझर

(NIphad politics at different turn ideological revolution of activists will determine direction nashik news)

गेल्या पाच दशकांपासून शरद पवार हे नाव निफाड तालुक्यावर अधिराज्य गाजवत आहे, ते विनायकदादा पाटील, मालोजीराव मोगल, वसंत पवार आणि नंतरच्या काळात दिलीप बनकर यांच्या झालेल्या राजकीय उज्ज्वलतेमुळे.

पक्षात दुही फोफावली असताना एकच पक्षाचे दोन पक्ष झाले. राज्य सरकारमध्ये अजित पवार सामील झाले त्यांना दिलीप बनकर यांनी साथ दिली. दुसरीकडे ज्या ठाकरे ब्रँडमुळे राजकीय कारकीर्द सक्षम करणाऱ्या अनिल कदमांनी एकनाथ शिंदे यांचे आमंत्रण झुगारून उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठापूर्वक राहणे पसंद केले.

दोन पक्ष आता चार झाल्याने यात भाजप मात्र निफाडमध्ये खरोखर दिलीप बनकर यांना साथ देणार का, हा मुख्य प्रश्न लाखो मतदारांना पडला आहे.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा पगडा तालुक्याच्या राजकीय निबंधात नेहमी घेतला जात असताना अशा घडामोडीत वैचारिक तिक्षणा असलेल्या कार्यकर्त्यांच्या मेंदूत मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

कट्टर हा शब्द लयास जात असताना त्याला सहानुभूतीची किनार लागल्याची चिन्हेही आहेत. याचे प्रत्यय सोशल मीडियाच्या पोस्टवरून स्पष्ट दिसत आहे.

निफाड हा सजग आणि इथला मतदार हुशार समजला जातो. परंतु वरच्या स्तरावर होत असलेले कमालीचे धक्कातंत्र कार्यकर्त्यांना घूमजाव करत सुटले आहे. त्यामुळेच एकीकडे निष्ठा तर दुसरीकडे सत्ता, हा सारीपाट बघायला मिळत आहे.

त्यामुळेच नेते नेत्यांच्या ठिकाणी काहीही करू द्या आपण बघ्याची भूमिका घ्यायची, हाही होरा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आजमितीस दिलीप बनकर हे अजित पवार यांच्या बरोबर गेले आहे, तर अनिल कदम हे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लाऊन सोबत आहेत.

यात परिवर्तन झाले ते कार्यकर्त्यांच्या विचारसरणीत आणि तीच विचारसरणी येणाऱ्या काळात कुठले पाऊल उचलते ते आचारसंहिता लागल्यावर कळेल.

AJit pawar with Dilip Bankar & Anil Kadam with Sharad Pawar
Kalyan Politics: ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत - दीपेश म्हात्रे

भाजप कोणत्या भूमिकेत

तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून भाजप हा लोकसभेत शिवसेनेच्या मदतीने मते घ्यायचे. विधानसभेत २०१४ चा अपवाद वगळला तर दोन्ही एकत्र राहायचे.

आता दिलीप बनकर यांच्यासोबत भाजप जाणार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अनिल कदम यांच्या सोबत राहणार, हे पचवणे अवघड असले तरी येणाऱ्या काळात ते करपटपने स्वीकारावे लागेल.

शिवसेना एकनाथ शिंदे गट यांची निफाडमध्ये बांधणी नस बरोबरीत आहे. एकूणच येणाऱ्या काळात काय काय घडामोडी घडतात, हे बघणे औत्सुक्याचे राहील.

तो विमान प्रवास शरद पवारांची दूरदृष्टीची चुणूक दाखवणारा

जेव्हा अजित पवार यांनी बंडखोरी केली तेव्हा शरद पवारांनी नाशिकमधून डॅमेज कंट्रोल अभियान सुरू केले. त्यात नागपूरच्या चार्टर विमानात त्यांनी दिलीप बनकर यांचे राजकीय विरोधक अनिल कदम यांना सोबत घेतले. ही खेळी आणि तो प्रवास व्हिडिओ प्रचंड गाजला. त्या वेळीही पवारांची राजकीय मत्सुद्देगिरी समोर आली.

त्यांचा हा प्रयोग भल्या भल्यांना आता डोक्यात मुंग्या आणणारा ठरत असला तरी राजकीय पटलावर निफाडकरांची जी वैचारिक क्रांती झाली त्यातून काय घडणार, हे सांगायला ज्योतिषशास्त्रही कच्चे पडेल, अशी स्थिती आहे.

"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. पक्ष अजित पवार यांना निवडणूक आयोगाने दिला आहे. शरद पवार सदैव माझे नेते राहतील. आमचे संबंध आजही मधुर आहेत. निफाडकरानी मला निवडून दिले आहे. आज सर्वांत जास्त विकास निधी निफाडला मिळाला आहे. त्यामुळेच मी अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय निकालापूर्वी घेतला. माझी प्रेरणा शरद पवार, तर निष्ठा अजित पवारांवर राहील."- दिलीप बनकर, आमदार

"खाल्ल्या मिठाला आणि दिल्या भाकरीला जागणे, माझे परम कर्तव्य आहे. ज्या ठाकरे नावाने आणि निफाडच्या लाखो जनतेने जे निकष लाऊन मला दोनवेळा विधानसभेत पाठवले त्यांचे उपकार कसे विसरू. मला माझ्या कपाळी कुठलाही शिक्का मारून घ्यायचा नाही. माझी जनसेवा कायम आहे आणि मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच कायम राहणार आहे."

-अनिल कदम, माजी आमदार, निफाड

AJit pawar with Dilip Bankar & Anil Kadam with Sharad Pawar
Islampur Politics : अजितदादांच्या व्यासपीठावर 'शिळ्या कढीला ऊत'; आमदार जयंत पाटलांना शह देणं अशक्य?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com