पिंपळगाव बसवंत- निफाड मतदारसंघात शिवसेना (उबाठा) गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. तीन महिन्यांपूर्वी पिंपळगावच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मशाल खाली ठेवत शिंदेच्या शिवसेनेत जाऊन धनुष्यबाण हाती घेतला. आता पुन्हा एकदा शिवसेना(उबाठा)ला धक्का बसला आहे. मुखेडचे सरपंच अमोल जाधव, सायखेड्याचे ग्रामपंचायत सदस्य अश्पाक शेख यांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाची होत असलेली पडझड स्वाभाविकच माजी आमदार अनिल कदम यांनाही हा ‘दे धक्का’ ठरणार आहे.