Nashik News: अवघ्या दीड हजारामध्ये महिना कसा काढायचा? निफाड तालुक्यातील निराधारांचा सरकारला सवाल

money
moneyesakal

Nashik News : आमदार, खासदारांची वेतनवाढ, वेतन आयोग व इतर ठिकाणी भरमसाट पैसे खर्च होतात. मात्र निराधारांच्या योजनांमध्ये सरकारने केवळ पाचशे रुपयांची वाढ केली आहे.

त्यामुळे केवळ दीड हजारात वाढत्या महागाईचा विचार करता महिना कसा काढायचा, असा प्रश्‍न निफाड तालुक्यातील निराधारांनी केला आहे. (Niphad taluka 12 thousand destitute people will now get subsidy of Rs 1500 per month nashik)

समाजातील निराधारांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने शासनामार्फत अनुदान दिले जाते. निफाड तालुक्यात १२ हजार निराधारांना आता महिन्याला दीड हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

पण सध्या महागाई वाढलेली असताना दीड हजार रुपये औषधालासुद्धा पुरणार नाहीत, अशी स्थिती आहे. अवघी पाचशे रुपयांची वाढ करून शासनाने निराधारांची बोळवण केली आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्तिवेतन, दिव्यांग निवृत्तिवेतन असे सुमारे १२ हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान तुटपुंजे असूनही ते वेळेवर मिळत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

money
Apla Davakhana: मिळकती नावावर नसल्याने ‘आपला दवाखाना’ अडचणीत

बऱ्याचदा लाभार्थ्यांना अनुदान का आले नाही म्हणून तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अनुदानासाठी लाभार्थ्यांना चार ते पाच महिने वाट पाहावी लागते. वाढत्या महागाईचा विचार करता कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्‍न निराधारांनी उपस्थित केला आहे.

"महागलेल्या जीवनावश्‍यक वस्तू पाहता शासनाकडून वाढ झालेले पाचशे रुपये अगदीच तोकडे आहेत. सरकारला समाजातील अन्य घटकांवर खर्च करायला पैसे आहेत. मात्र आमच्यासाठी सरकार हात आखडता घेते. आहे ते अनुदानही वेळेत मिळत नाही."

- जिजाबाई शिंगाडे, लाभार्थी

money
Nashik Political: मालेगावला महागटबंधन आघाडीत बिघाडी! आमदारांवर स्वपक्षाच्या नगरसेवकांकडून टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com