नामपूर- शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून यंदा मार्चपासून राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी शाळांना ३० जूनपर्यंत करावी लागणार असून, भाषा आणि गणित या विषयांसाठीच्या अध्ययन क्षमता साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्या शाळा, शिक्षकांसह पर्यवेक्षिक यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा सन्मान अभियानात होणार आहे.