Nashik Sports News : आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेसाठी ‘संस्कृती नाशिक’च्या कर्णधारपदी निशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nisha Vaijal

Nashik Sports News : आमंत्रितांच्या खो-खो स्पर्धेसाठी ‘संस्कृती नाशिक’च्या कर्णधारपदी निशा

नाशिक : मोहोळ (जि. सोलापूर) येथे राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाच्या आमंत्रितांच्या खो- खो स्पर्धा होत आहेत. या स्‍पर्धेसाठी संस्‍कृती नाशिक संघाच्‍या कर्णधारपदी निशा वैजल हिची निवड केली आहे. (Nisha as captain of Sanskrit Nashik for Kho Kho tournament of invitees Nashik Sports News)

हेही वाचा: Dr. Babasaheb Ambedkar यांचा पुतळा का हटवला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथील लोकप्रतिनिधी यशवंत माने यांनी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पुरुष गटात १६ तर महिला गटात ८ संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत महिला गटात नाशिकच्या संस्कृती या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघात कर्णधार म्‍हणून निशा वैजल ही धुरा सांभाळेल. तसेच मनिषा पडेर, कौसल्या पवार, सरीता दिवा, सुषमा चौधरी, दीपीका बोरसे, ज्योती मेढे, ऋतुजा सहारे, तेजल सहारे, दिक्षा सिताड, विद्या मिर्के, नामिशा भोये यांचा समावेश आहे. तर मार्गदर्शक म्‍हणून गौरव ढेमसे आणि व्‍यवस्‍थापक म्‍हणून रवींद्र पवार हे जबाबदारी सांभाळत आहेत.

हेही वाचा: Dhule Political News : धुळे महापालिकेत भाजप ‘अभेद्य'

टॅग्स :Nashiksports