Nitesh Rane
sakal
नाशिक: हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी, हा उपक्रम त्यासाठीच आहे. हिंदूंच्या हिताविषयी हिंदूराष्ट्रात बोलायचे नाही, तर कुठे बोलायचे? व्यवहार करताना समोरचा हिंदू आहे का हेही पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी येथे केले. सिंहस्थ कुंभमेळ्यात हिंदू व्यावसायिकांनाच प्राधान्य द्यावे, सर्वधर्मसमभावाचे कंत्राट आपणच घेतले आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.