nitesh rane
nitesh rane

Nitesh Rane: अतिक्रमणांच्या नावाने लँड जिहाद; कारवाई न झाल्यास जनआंदोलन

Nitesh Rane : नाशिक शहर व जिल्ह्यात सामाजिक तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. अनधिकृत भोंग्यांसाठी न्यायालयाचा आदेश आहे. ते केव्हा वाजले पाहिजेत, कधी वाजले पाहिजेत, याची डेडलाइन आहे. याविषयीची काही नियमावली आहे.

सर्व कायदे हिंदू धर्मानेच पाळले पाहिजे का, इतर धर्मांनी का नाही, या भोंग्यांवर कारवाई करणार नसाल तर येणाऱ्या काळात जनआंदोलन उभे करावे लागेल. सरकार आपलं आहे. अतिक्रमणांच्या नावाने लँड जिहाद सुरू आहे. (Nitesh Rane statement Land Jihad in name of encroachments nashik news)

रात्री दीड-दोनला केवळ अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल, तर यात विशेष लक्ष घालावे लागेल, असे आमदार नीतेश राणे यांनी गुरुवारी (ता. २१) सांगितले.

आमदार राणे यांनी बोलताना नाशिकचे पोलिस आयुक्त आणि महापालिकेचे आयुक्त या दोघांनाही ‘अल्टिमेटम’ दिला. ते म्हणाले, की पोलिस खाते आमचे आहे. मात्र, पोलिस विभागात काही सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या भाषेत बोलायला गेले तर सडके द्राक्ष आहेत. त्यांना आम्हाला बाजूला करण्याचे काम गृहमंत्रिसाहेबांच्या माध्यमातून करावे लागेल. त्रासदायक अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणारच. लँड जिहादच्या वाढणाऱ्या अवैध भद्रकालीतील अतिक्रमणासंदर्भात मी सभागृहात विषय घेतला आहे.

भद्रकाली परिसरात दुचाकीच्या मागच्या सीटमध्ये अनेक लोक अमली पदार्थ आणि ड्रग्ज विकत आहेत. त्याचे व्हिडिओही माझ्याकडे आहेत. ते मी विधानसभेत सादर केले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी गजेंद्र पाटील यांच्यावर कारवाई होईल. भद्रकालीतल्या अवैध अतिक्रमणांवर नाशिक महापालिका आयुक्तांनी लक्ष घालावे.

nitesh rane
Nitesh Rane on Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा शाप आहे त्यामुळे हे घडतयं" नितेश राणेंचा हल्लाबोल

आयुक्तांना पुन्हा आठवण करून देण्याची गरज भासली नाही पाहिजे. जिहाद्यांना मदत करायची असेल तर कारवाई करण्याची आमची तयारी आहे, हे महापालिका आयुक्तांनी लक्षात ठेवावे. अतिक्रमणांच्या नावाने लँड जिहाद सुरू आहे. रात्री दीड-दोनला केवळ अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना हॉटेल चालवायची परवानगी मिळत असेल, तर यात विशेष लक्ष घालावे लागेल.

‘त्यांचे राम मंदिरात योगदान नाही’

राम मंदिराचे आंदोलन सुरू होते, त्या वेळी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’च्या तिसऱ्या मजल्यावर कॅमेरा पुसत होते; तर संजय राऊत यांनी मंदिराविरोधात लेख लिहिला होता. त्यामुळे त्यांचे राम मंदिराबाबत योगदान नाही, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली. विधानसभेत राणे यांनी सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आरोप केले.

त्या प्रकरणी त्याची चौकशी सुरू असून, त्यावर योग्य वेळी बोलेन, असे ते म्हणाले. भाजपवाले चिलीम ओढून मग बोलतात, यावर बोलताना आमदार राणे यांनी, ‘‘खासदार राऊत सकाळी नाइंटी पिऊन बोलतात, नाशिकमध्ये ते आले की बोलण्यापूर्वी पिऊन बोलतात, हवं तर वाहतूक पोलिसांकडे असलेले ड्रिंकिंग मशिन लावून पाहा, ते पळून जातील,’’ अशी टीका केली.

nitesh rane
Nitesh Rane:"सिंधुदुर्ग किल्याच्या खाली पाणी  खोल, नावे द्या कडेलोट करतो"; नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com