esakal | नाशिक शहरा बाहेरून होणार रिंग रोड; नितीन गडकरींची माहिती | Nashik
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin-Gadkari

नाशिक शहरा बाहेरून होणार रिंग रोड; नितीन गडकरींची माहिती

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गासोबतच आगामी काळात समृद्धी महामार्ग, तसेच नुकताच मंजूर झालेला सुरत ते चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस मार्ग नाशिक महापालिकेच्या हद्दी जवळून जात असल्याने भविष्यात नाशिकमधील वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता शहराच्या बाहेरून या महामार्गाला जोडणाऱ्या रिंग रोड कामास गती द्यावी, तसेच ६० मीटर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत तयार करावा, अशी मागणी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. सदरचा प्रस्ताव रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचे गडकरी यांनी माहिती दिली.


दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या गडकरी यांची क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. अध्यक्ष रवी महाजन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, क्रेडाईचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष कृणाल पाटील या वेळी उपस्थित होते. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग हा नाशिकपर्यंत सहा पदरी मार्गाने जोडावा. समृद्धी महामार्गामुळे पडघा ते मुंबई या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढणार असल्याने पडघा ते मुंबई हा रस्ता आठ पदरी करावा, तसेच नुकत्याच मंजूर झालेल्या सुरत- चेन्नई महामार्गालगतची जमीन रेल्वे मार्गासाठी अधिग्रहीत करण्याची विनंती करण्यात आली. महापालिका व राज्य सरकारने जमिनी अधिग्रहीत करून दिल्यास शहराबाहेरील रिंग रोडचे काम सुरू करण्यात येईल व त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

हेही वाचा: नाशिक-मुंबई अंतर दोन तासांवर आणणार; नितीन गडकरींचे आश्वासन

loading image
go to top