नाशिक- जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी येत्या दहा दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच ज्या खात्याशी निगडित हा प्रश्न असेल त्यांच्याकडेही शेतकऱ्यांना घेऊन जाण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकच्या शिष्टमंडळास दिले.