निवृत्तीनाथ मंदिराच्या अध्यक्षांची बडतर्फी

निवृत्तीनाथ मंदिराच्या अध्यक्षांची बडतर्फी
Published on: 
निवृत्तीनाथ मंदिराच्या अध्यक्षांची बडतर्फी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठराव; धर्मादाय विभागाकडे पाठविणार सकाळ वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, ता. ३ : येथील संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहूल साळुंखे यांच्या वर्तनावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त मंडळाची शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत साळुंखे यांना अध्यक्षपदावरून बडतर्फ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी धर्मादाय खात्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वीही मंदिर संस्थानातील एका विश्वस्ताच्या महिलेशी संबंधित वर्तनाचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर नव्या प्रकरणामुळे देवस्थानची प्रतिमा पुन्हा चर्चेत आली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीस अध्यक्ष राहूल साळुंखे तसेच माधवदास राठी गैरहजर होते. निवृत्तीनाथ मंदिरास वारकरी संप्रदायाकडून वेळोवेळी देणग्या तसेच विविध वस्तू दान स्वरूपात दिल्या जातात. त्यामुळे भाविकांच्या सोयी-सुविधांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळावर वारकरी संप्रदायाशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या व्यक्तींना प्राधान्य मिळावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मंदिराशी संबंधित वादांमुळे वारकरी भाविकांच्या भावना दुखावत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com