Nashik : आयुक्त परदेशात अन् अधिकारी साइटवर; NMCचे कामकाज ठप्प

NMC News
NMC News esakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटी संदर्भातील प्रशिक्षणाच्या निमित्ताने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार परदेश दौऱ्यावर गेले आहे. मात्र आयुक्तांनंतर महापालिकेला कोणी वाली आहे की नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. मुख्यालयात एकही अधिकारी जागेवर नसल्याने कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. (nmc Commissioner at abroad officers on site functioning of NMC stops nashik Latest Marathi News)

NMC News
SAKAL Exclusive : गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी महसूल यंत्रणेची दमछाक

महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार सोमवार (ता. १५) पासून स्पेनच्या दौऱ्यावर गेले आहे. केंद्र शासन पुरस्कृत दौऱ्याहून आयुक्त शनिवारी परततील. तोपर्यंत प्रभारी आयुक्तपदाचा कार्यभार उपायुक्त अर्चना तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मंगळवारी राज्यपालांचा दौरा असल्याने महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून स्वागताला त्या गेल्या. त्यानंतर उर्वरित अधिकारी मात्र दिवसभर पालिका मुख्यालयात दिसले नाही.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे हे दहा दिवसांच्या रजेवर गेले आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार डॉ. राजेंद्र भंडारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुख्य लेखाधिकारी बी.जी. सोनकांबळे तसेच लेखापाल नरेंद्र महाजन हेदेखील पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेले आहे. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील वैयक्तिक कामासाठी रजेवर गेले आहे. महापालिकेच्या नगररचना व बांधकाम विभागाचे अभियंते मंगळवारी (ता. १५) जागेवर दिसून आले नाही.

काहींनी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे कारण दिले, तर काहींनी फील्डवर असल्याचे सांगत महापालिकेच्या मुख्य कामाकडे पाठ फिरविली. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके वगळता महापालिकेच्या दैनंदिन कामाशी संबंधित एकही अधिकारी जागेवर दिसून आले नाही. त्यामुळे आयुक्तांची पाठ फिरताच महापालिकेचे कामकाज ठप्प झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

NMC News
Nashik Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला 6 महिने शिक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com