आपत्ती व्यवस्थापन पथकांना स्वतंत्र ड्रेस कोड : आयुक्त पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Commissioner Ramesh Pawar

आपत्ती व्यवस्थापन पथकांना स्वतंत्र ड्रेस कोड : आयुक्त पवार

नाशिक : शहरातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (Disaster Management Team) अधिक भक्कम करण्यासाठी महापालिका (NMC) शहरातील सहाही अग्निशमन दलाच्या (Firefighters) विभागीय कार्यालयाच्या इमारतीवर स्वयंचलित पर्जन्यमापक (Automatic rain gauge) बसविणार आहे. तसेच, आपत्ती काळात मदत करणाऱ्या महापालिकेच्या पथकांना स्वतंत्र ड्रेस कोड देण्याचा विचार करीत आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी सोमवारी (ता. २७) आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत या सूचना दिल्या. (NMC Commissioner Ramesh Pawar statement about dress code for disaster management teams Nashik News)

दरवेळी पाऊस आला म्हणजे सराफ बाजार, दहिपुलावर रस्त्यावर पाणी साचून घर आणि दुकानात घुसते. त्याअनुषंगाने आयुक्तांनी बैठक घेत त्या भागातील गटारीचे ढापे मोकळे मोकळे करण्यासह आपत्ती व्यवस्थापन विषयक उपायांच्या सूचना केल्या. शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उपायुक्त विजयकुमार मुंडे आदींसह संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. बैठकीत आयुक्त पवार यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे तालुकानिहाय पाऊस मोजला जात असला तरी, शहरात मात्र महापालिकेची स्वतःची अशी यंत्रणा नाही. त्यामुळे पाऊस किती झाला, धरणातून किती विसर्ग होणार आहे, ही महत्त्वाची माहिती महापालिकेला नियमित मिळण्यासाठी जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

शहरातील सहाही विभागातील पाऊस मोजण्यासाठी विभागीय अग्निशमन दलाच्या इमारतीवर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी सूचना देताना आपत्ती व्यवस्थापन विषयक त्रूटी दूर करण्यासाठी शहरातील पावसाचे मोजदाद, विसर्गाची माहिती घेणे यासह जलसंपदा विभागाच्या संपर्कात राहून आपत्ती व्यवस्थापन उपाययोजना बळकट करण्याच्या सूचना दिल्या. नैसर्गिक आपत्ती किंवा पूरस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना रस्त्यावर काम करावे लागते. मात्र, गर्दीत त्यांना अडचणी येतात. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा गणवेश असल्याने ते त्वरित लक्षात येतात. पण इतर कर्मचारी लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना काम करण्यात अडथळे येतात. ते टाळण्यासाठी स्वतंत्र ड्रेसकोड असावा, अशाही सूचना महापालिका आयुक्तांनी मांडल्या.

हेही वाचा: अक्कडसे शिवारात अवैध वाळू वाहतूक; 2 ट्रॅक्टर ताब्यात

जनजागृतीच्या सूचना

पावसाळा सुरू झाला असून आपत्ती व्यवस्थापन विषयक तक्रारी वाढल्याने महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला पावसाळ्यात अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना केल्या. विशेषतः शहरातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांना पावसाळ्यात सर्वांनी त्यांच्या विभागात फिल्डवर राहावे, लोकांशी संपर्कात राहावे, सर्व प्रकारच्या सूचना तसेच जनजागृतीच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: नाशिक : प्रतीकात्मक अंत्ययात्रेतून शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन

Web Title: Nmc Commissioner Ramesh Pawar Statement About Dress Code For Disaster Management Teams Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top