
अस्वच्छता करणाऱ्या डुकरांना आता थेट ठार मारण्याचा निर्णय
नाशिक : वराह अर्थात डुकरे (Pigs) पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवूनही पकडले जात नाही. त्या पार्श्वभूमीवर अस्वच्छता करणाऱ्या डुकरांना पकडून आता थेट ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जनावरे शहराबाहेर नेण्याचे आवाहन महापालिकेकडून (NMC) करण्यात आले आहे. (nmc Decision to directly kill pigs who unclean city nashik latest Marathi news)
हेही वाचा: अमरिशभाई, अग्रवालांचीच फाईल ‘पेंडिंग’; सर्वसामान्यांचे काय?
महापालिकेने शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार शहरात घंटागाडी चालवली जाते, मात्र अद्यापही जवळपास 52 ठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट आहे. तेथे डुकरे आढळून येत असल्याने महापालिकेने डुकरे हटवण्यासाठी मोहीम राबवली.
त्यासाठी कंत्राटदेखील नियुक्त करण्यात आला. मात्र, कंत्राटदाराकडून डुकरे पकडले गेले नाही, मात्र मोठ्या प्रमाणात बिले काढण्यात आल्याचा प्रकार घडला. त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून धोरण निश्चित करण्यात आले आहे.
त्यात जनावरांच्या मालकांना नोटीस देऊनही उपयोग होत नसल्याने आता डुकरे पकडून थेट मारले जाणार आहे. डुक्कर मृत झाल्यानंतर संबंधित मालकाला भरपाईसाठी कुठलाही दावा करता येणार नसल्याची तरतूद कायद्यात असल्याने त्याचा आधार घेऊन मोहीम राबविली जाणार आहे.
मोकाट कुत्रे पकडण्यासाठी महापालिकेने पथक नियुक्त केले आहे. त्याच धर्तीवर डुकरे पकडण्यासाठी पाच कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले जाणार आहे. डुकरे पकडून थेट ठार केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी दिली.
हेही वाचा: विमानसेवेच्या माध्यमातून Nashik आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडणार : डॉ. भारती पवार
Web Title: Nmc Decision To Directly Kill Pigs Who Unclean City Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..