NMC Hoardings Audit: शहरातून वावरताना नाशिककरांचा प्रवास धोकादायक! 845 पैकी 626 होर्डिंग्ज नादुरुस्त

NMC on Unauthorized Hoardings
NMC on Unauthorized Hoardingsesakal

NMC Hoardings Audit : महापालिकेच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ८४५ पैकी ६२६ होर्डिंग नादुरुस्त असल्याची बाब समोर आली असून यातील १६ अतिधोकादायक होर्डिंग हटविण्यात आले आहे,

दरम्यान महापालिकेच्या वतीने स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सी अहवालानुसार ६२६ होर्डिंग नादुरुस्त असल्याने नाशिककरांचा शहरातून वावरताना सुरू असलेला प्रवास धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

कमी व अधिक प्रमाणात नादुरुस्त असलेले होर्डिंग दुरुस्ती करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत होर्डिंगधारकांनी मागून घेतली आहे. (NMC Hoardings Audit Dangerous journey of Nashik people while walking through city 626 out of 845 hoardings out of order)

पिंपरी व चिंचवड महापालिका हद्दीत जानेवारी महिन्यात महामार्गावर असलेले अनधिकृत होर्डिंग कोसळले होते यात पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना होर्डिंग स्टॅबिलिटी अर्थात स्थिरता तपासण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार विविध कर विभागाने ८४५ होर्डिंगधारकांना सूचना पत्र पाठविले. होर्डिंगची स्टॅबिलिटी तपासण्यासाठी संदीप फाउंडेशन सिव्हिल टेक व केबीटी महाविद्यालयातील एजन्सीची नियुक्ती करण्यात आली.

विविध होर्डिंगधारक कंपन्यांनी महापालिकेला स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पुन्हा एजन्सीच्या मार्फत धोकादायक होर्डिंग व अति धोकादायक होर्डिंग तपासण्याबरोबरच दुरुस्ती तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार ८४५ होर्डिंग धारकांनी स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बरोबरच तीनही संस्थांकडून गोपनीय अहवाल मागविण्यात आला होता.

संस्थांकडून अहवाल प्राप्त

सिव्हिल टेक संस्थेने ४२४ होर्डिंगचा अहवाल सादर केला, त्यात २४० होर्डिंग तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याची तर सहा होर्डिंग अति धोकादायक असल्याने तातडीने उतरविण्याच्या सूचना दिल्या.

संदीप फाउंडेशन, ओके बी टी महाविद्यालयाकडून अहवाल महापालिकेला प्राप्त झाले या तीनही संस्थांकडून ६२६ होर्डिंगची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC on Unauthorized Hoardings
Sharad Pawar Politics: फोडाफोडीचे राजकारण..! अटलजींनी शरद पवारांना संसदेत दाखवला होता आरसा

प्रत्यक्ष पाहणीतून होणार सर्वेक्षण

महापालिकेकडे प्राप्त आकडेवारीनुसार ८४५ पैकी २३ होर्डिंगची नोंदणी दुबार असल्याचे आढळून आले आहे.

यावरून शहरात नोंदणी पेक्षा अधिक होर्डिंग उभारण्यात आल्याचा संशय असून त्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन होर्डिंगची तपासणी केली जाणार आहे अशी माहिती विविध विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिली.

विभाग निहाय अतिधोकादायक व नादुरुस्त होर्डिंग्ज

विभाग अतिधोकादायक नादुरुस्त

पश्चिम ९ २५६
सिडको ३ ४८
पंचवटी १ ८७
नाशिकरोड २ ६७
पूर्व १ १२८
सातपूर - ४०
------------------------------------
एकूण १६ ६२६

NMC on Unauthorized Hoardings
Ajit Pawar Mother: अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, 'अजित..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com