NMC News : पेस्ट कंट्रोल ठेक्याचा मेहनताना वादात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC News : पेस्ट कंट्रोल ठेक्याचा मेहनताना वादात!

नाशिक : पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला मुहूर्त लागल्यानंतर आता मेहनताना वादात सापडला आहे. एस. आर, पेस्ट कंट्रोल व मे. दिग्विजय एंटरप्रायझेस या दोन ठेकेदारांनी ‘सी’ वर्गवारीनुसार मागितलेल्या मेहतान्यातील रक्कम वादात सापडली आहे. दिग्विजय एन्टरप्रायजेसने चाळीस टक्क्यांचा अधिक मेहनताना मागितला. (NMC News Pest control contract is in dispute nashik news)

७ ऑगस्ट २०१९ मध्ये पेस्ट कंट्रोलचा ठेका संपुष्टात आला. त्यानंतर मे. दिग्विजय एन्टरप्राईजेसला सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. पेस्ट कंट्रोल ठेक्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला, परंतु जो ठेका अठरा कोटींचा होता, तोच ठेका नव्याने ४६ कोटींवर पोचल्याने वाद निर्माण झाला.

सदरचा ठेका रद्द केल्यानंतर मे. दिग्विजय एंटरप्रायझेसने उच्च न्यायालयात आव्हान दिले. स्थगिती उठल्यानंतर ठेक्याची किंमत कमी करण्यात आली. ३३ कोटी रुपये किमतीची विभागवार निविदा काढण्यात आली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यानुसार सिडको, सातपूर,पश्चिम या तीन विभागासाठी एस. आर. पेस्ट कंट्रोल तर नाशिकरोड, पूर्व, पश्चिम विभागासाठी मे. दिग्विजय एंटरप्रायझेस पात्र ठरले.

आर्थिक परिक्षणात एस. आर. पेस्ट कंट्रोलने कर्मचाऱ्यांना साहित्य पुरविण्यासाठी नऊ लाख रुपयांचा मेहनताना तर दिग्विजयने वीस लाख रुपयांचा मेहनताना मागितला आहे. त्यामुळे या तफावतीची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती मलेरिया विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली.

टॅग्स :NashiknmcPest Control