NMC Kumbha Mela Fund Audit: सिंहस्थाच्या निधीचे ऑडिटच नाही! माहितीच्या अधिकारातून बाब उघड

२७-२८ साठी अडचण येण्याची शक्यता
NMC News
NMC Newsesakal

NMC Kumbha Mela Fund Audit : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून विकासकामांसाठी निधीची मागणी केली जात असतानाच २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने महापालिकेला दिलेल्या जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे ऑडिट झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

त्यामुळे आगामी २०२७- २८च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (No Audit of Simhastha kumbh mela Fund Disclosure through Right to Information nashik news)

२०१५ व १६ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा झाला. त्यासाठी राज्य शासनाने जवळपास २३७८ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. राज्य सरकारने नाशिक महापालिकेला १०५२.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

राज्य शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागांना देखील निधी मंजूर करण्यात आला. नाशिक महापालिकेला १०५२.६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला, त्यापाठोपाठ राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला ६६० कोटी, तर जलसंपदा विभागाला १६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ९८ कोटी रुपये, तर नाशिक ग्रामीण व शहर पोलिसांसाठी ९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. नाशिक महापालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून झालेल्या कामांचे, तसेच निधीचे लेखापरीक्षणच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
NMC School : महापालिकेच्या शिक्षकांना 1 तास Extra! विद्यार्थी टक्का, गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी महापालिकेकडे माहिती मागविली होती. महापालिकेच्या लेखा विभागाने प्राप्त झालेल्या निधीच्या विनियोगाचे ऑडिटेड बॅलन्स शीट तयार केले नसल्याची माहिती जानी यांनी दिली.

२०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला असताना मागील संस्थांच्या खर्चाचे ऑडिट नसल्याची बाब समोर आल्याने झालेल्या खर्चाबाबत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आगामी सिंहस्थात होणार अडचण

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी नाशिक महापालिका व शासनाकडून सुरू झाली आहे. यंदाच्या सिंहस्थासाठी जवळपास दुप्पट म्हणजे पाच हजार कोटींच्या निधीची मागणी नोंदविली जाण्याची शक्यता आहे.

मात्र मागील सिंहस्थात झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षण झालेले नसल्याने पुढील निधी मिळण्यात अडचण निर्माण होणार आहे.

NMC News
Onion Rates Hike : जिल्ह्यासह राज्यात कांद्याचा भाव क्विंटलला सरासरी हजारच्या पुढे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com