
Nashik : यांत्रिक झाडू खरेदीसाठी अधिकारी गुजरातला
नाशिक : महापालिका केंद्र सरकारकडून (Central government) मिळणाऱ्या पैशांतून रस्ते झाडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी करणार असून यांत्रिकी झाडूची पाहणी व अभ्यास करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (NMC commissioner Ramesh Pawar) यांनी महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुजरातला पाठवले आहे. त्यांनी मंगळवारी (ता. २१) गुजरातमधील भावनगरला जाऊन यांत्रिकी झाडूची (mechanical brooms) पाहणी केली. (nmc Officers go to Gujarat to buy mechanical brooms Nashik news)
हेही वाचा: विदेशी मद्याची अवैध वाहतूक; कारसह 11 लाखांचा मद्यसाठा जप्त
महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड व यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी हे दोन अधिकारी गुजरातमधील भावनगर येथे गेले. त्यांनी भावनगरला यांत्रिकी झाडूचे निरीक्षण करून अभ्यास केला. सुमारे अडीच कोटीचा यांत्रिकी झाडू असून महापालिकेला केंद्र सरकार निधी देणार आहे. यामुळे महापालिकेवर त्याचा भार पडणार नाही.
हेही वाचा: सेना, कॉंग्रेस आमदारांच्या बैठक; भाजप सरकार लवकरच...
Web Title: Nmc Officers Go To Gujarat To Buy Mechanical Brooms Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..