गणेशोत्सवासाठी NMC ॲक्शन मोडवर; आयुक्तांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

Nashik Police Commissioner & NMC Commissioner visit to Procession Route of Ganeshotsav 2022
Nashik Police Commissioner & NMC Commissioner visit to Procession Route of Ganeshotsav 2022esakal

नाशिक : पाच दिवसांवर आलेल्या श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीची लगबग महापालिका पातळीवर सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (ता. २६) मिरवणुक मार्गाची पाहणी करत डांबरीकरण, स्वच्छता, अतिक्रमण हटविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मिरवणुक मार्गावरील वीज वितरण कंपनीच्या अडथळा ठरणाऱ्या तारा समन्वय साधून दूर करण्याच्या सूचना दिल्या. (NMC on action mode for Ganeshotsav 2022 Inspection of Procession Route by Commissioners Nashik Latest Marathi News)

३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणेशभक्तांना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये यासाठी तयारीचा भाग म्हणून महापालिका आयुक्तांसह पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी संयुक्त पाहणी केली.

सारडा सर्कल ते अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा मार्गे गौरी पटांगण दरम्यानच्या मिरवणूक मार्गाची पाहणी या वेळी करण्यात आली. दूध बाजार, मेनरोड, पंचवटीतील मालवीय चौक, मालेगाव स्टॅन्ड या भागातील मिरवणुकीला अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारांचा बंदोबस्त करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधण्याच्या सूचना या वेळी दिल्या.

गोदावरी नदी पात्राच्या पाहणीत नदी किनारी असलेली अतिक्रमणे हटविण्याबरोबरच स्मार्टसिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामांचा धावता आढावा घेतला. चार दिवसात पूर्ण होणारी कामे तातडीने मार्गी लावावी, अन्यथा उत्सव दरम्यान बंद ठेवण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, महापालिका पंचवटी, पूर्व, पश्चिम विभागातील स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

Nashik Police Commissioner & NMC Commissioner visit to Procession Route of Ganeshotsav 2022
पाण्यासाठी घोटीकरांची वणवण; पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयीन निर्णयाची प्रतिक्षा

मिरवणुक मार्गावरील दक्षता

- मिरवणूक मार्गावरील खड्डे डांबराने बुजवावेत.

- वाहनांचे अतिक्रमण हटवावे.

- मार्गावरील जलवाहिन्यांची गळती थांबवावी.

- रविवार कारंजा जवळील मलबा उचलावा.

- महाबळ चौकातील आयलँड दुरुस्ती.

- स्मार्टसिटीचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे.

- विद्युत विषयक कामे पूर्ण करावी.

- मिरवणूक मार्गावरील विद्युत तारांचा अडथळा हटवावे.

- मार्ग स्वच्छ करावा.

Nashik Police Commissioner & NMC Commissioner visit to Procession Route of Ganeshotsav 2022
Bike Theft Crime : शहरातून 6 दुचाकींची चोरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com