NMC Pest Control Work: पेस्ट कंट्रोलचे काम वादग्रस्त ठेकेदाराकडे; डेंगीचा प्रकोप वाढत असल्याचे निमित्त

nmc
nmc esakal

NMC Pest Control Work : पावसाळ्यात साथजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याबरोबरच डेंगीचा प्रकोप वाढत असल्याचे निमित्त करून महापालिकेच्या मलेरिया विभागाने वादग्रस्त दिग्विजय एंटरप्राईजेसला धूर व औषध फवारणीचे काम दिले आहे.

त्यामुळे आता पंचवटी, नाशिक रोड व पूर्व या तीन विभागांमध्ये नियमित फवारणी होण्याची अपेक्षा अपेक्षा आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने मुदतवाढ दिली जात असताना दर परवडत नसल्याचा साक्षात्कारदेखील संबंधित ठेकेदाराला झाला.

त्यामुळे काम सोडून देण्याची धमकी दिल्याने ऐनवेळी नवीन ठेकेदार शोधायचा कुठे, असा गंभीर प्रश्न पडलेल्या मलेरिया विभागाने सारवासारव केली आहे. (NMC Pest control work to controversial contractor Dengue outbreak rise nashik)

साथजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी शहरात पेस्ट कंट्रोलचे काम आउटसोर्सिंगच्या माध्यमातून होते. अनेक वर्षांपासून दिग्विजय एंटरप्राइजेस माध्यमातून हे काम केले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने बिले काढणे, औषध फवारणी न करणे आदी संदर्भात तक्रारी होत्या. २०१९ ला ठेक्याची मुदत संपली.

त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये यापूर्वी देण्यात आलेल्या अठरा कोटींचा ठेका थेट ४६ कोटींवर पोचविण्यात आला. सदर बाब संशयास्पद वाटल्याने तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली.

या विरोधात दिग्विजय एंटरप्राइजेस ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेतली. ऑक्टोबर २०२२ मध्ये न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर तत्काळ निकाल लागणे अपेक्षित होते. मात्र उच्च न्यायालयात सदरचे प्रकरण प्रलंबित राहिल्याने सातत्याने मुदतवाढ दिली गेली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

nmc
NMC News: खरोखर दुरुस्तीची आवश्यकता आहे का? पंचवटी, नाशिक रोड विभागात शौचालय दुरुस्तीची कामे

त्यानंतर तत्कालीन आयोग रमेश पवार यांनी पेस्ट कंट्रोलच्या धोक्यातील अनावश्यक खर्चात कपात केली. त्यामुळे ३३ कोटींवर खर्च आला. तीन विभाग मिळून एक अशा दोन निविदा काढण्यात आल्या. सिडको, सातपूर, पश्चिम विभागासाठी एस. आर. पेस्ट कंट्रोल तर नाशिक रोड, पूर्व व पंचवटी विभागासाठी दिग्विजय एंटरप्राइजेस पात्र ठरले.

सूरज एंटरप्राइजेस या कंपनीने एस. आर. पेस्ट कंट्रोलच्या कागदपत्रांवर आक्षेप घेतल्याने उच्च न्यायालयाने या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यासाठी स्थगिती दिली. परंतु, दुसरीकडे दिग्विजय एंटरप्राइजेसने जुने दर परवडत नसल्याचे कारण देत काम सोडण्याचा इशारा दिला.

त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश दिले जाणार आहे.

nmc
NMC Water Bill Recovery: अवघ्या 15 दिवसातच आनंदावर विरजण! पाणीपट्टीत नीचांकी वसुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com