NMC Recruitment : भरतीची तांत्रिक बाबी पूर्ण करताना दमछाक; सुशिक्षित बेरोजगारांना वर्षभर वाट पाहावी लागणार

nmc recruitment
nmc recruitment esakal

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील चाळीस हजार जागा भरण्याचा संकल्प राज्य शासनाने करताना महसुली खर्चाची ३५ टक्क्यांची अट शिथिल केली आहे.

त्याअनुषंगाने महापालिकेचा २८०० रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी महापालिकेच्या माध्यमातून थेट भरती न करता टीसीएस किंवा आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातूनच भरती केली जाणार आहे.

परंतु सदरची भरती तत्काळ होणार असल्याचे सांगितले जात असले तरी तांत्रिक बाबी पूर्ण करताना होणारी दमछाक लक्षात घेता किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. (NMC Recruitment Tired while completing technical aspects of recruitment Educated unemployed have to wait for year nashik news)

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७०९० पद मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० हून अधिक पदे रिक्त आहे. मागील २१ वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती झालेली नाही. ‘ब’ संवर्गानुसार शासनाच्या मान्यतेसाठी १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाकडे प्रलंबित आहे.

शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागाच्या ३४८, वैद्यकीय व आरोग्य विभागातील ३५८ अशा एकूण ७०४ पदांच्या भरतीला मान्यता दिली. भरती करताना टीसीएस किंवा आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातूनच भरतीच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार महापालिकेने आयबीपीएस संस्थेसमवेत कराराची प्रक्रिया सुरू केली आहे. तर प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरिक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी(स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या पदांना व अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी दिली.

शासनाने आता विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी ४ मे २००६ ला घेतलेल्या निर्णयात एक वेळेसाठी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी आस्थापना खर्चाची मर्यादा ३५ टक्के इतकी होती. परंतु जवळपास सर्वच महापालिकांचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

nmc recruitment
Traffic Management : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या

त्यामुळे अत्यावश्यक पदे भरता येत नव्हती. आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट तात्पुरती शिथिल करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्यासाठी टीसीएस व आयबीपीएस संस्थेची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे रिक्त पदांची भरती करण्यासाठी दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत.

निर्देश असले तरी...

२८०० रिक्त पदे भरण्याची कारवाई तत्काळ करण्याचे निर्देश शासनाचे असले तरी प्रत्यक्षात एक वर्षांहून अधिकचा कालावधी त्यासाठी लागेल अशी सूत्रांची माहिती आहे.

त्रयस्थ संस्थेकडून प्रस्ताव मागविणे, अटी व शर्ती निश्चित करणे, करारनामा करणे, भरतीसाठी जाहिरात प्रक्रिया राबविणे, परिक्षा, मुलाखत व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणे यासाठी वर्षभराहून अधिक कालावधी लागणार आहे.

nmc recruitment
JEE Mains Exam : जेईई मेन्‍स परीक्षा अर्जाची 12 मार्चपर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com