NMC School Uniform : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश

NMC School Uniform
NMC School Uniformesakal

NMC School Uniform : अनुसूचित जाती- जमाती व आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाल्यानंतर आता महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील खुल्या संवर्गातील सात हजार ३४२ विद्यार्थी, तसेच माध्यमिक विभागाच्या २९४१ विद्यार्थ्यांच्या गणवेषासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

त्यामुळे गणवेश यावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी दुहीची भावना कमी होण्यास मदत होणार आहे. (NMC School Uniform for open category students nashik)

केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अनुसूचित जाती- जमातीसह दारिद्र रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिला जातो.

महापालिकेच्या शाळेत या प्रवर्गातील १९७५९ विद्यार्थी आहे. त्यासाठी शासनाने एक कोटी १८ लाख ५५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले. त्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश मोफत मिळेल, मात्र खुल्या गटातील ७३४२ विद्यार्थी हे गणवेषापासून वंचित राहणार होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC School Uniform
Maharashtra Politics: शिवसेना-भाजपमधील आमदारांच्या नाराजीवर चर्चा? शिंदे-फडणवीसांमध्ये रात्री खलबतं

महापालिकेच्या महासभेने यापूर्वी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महापालिकेच्या आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी प्रतिविद्यार्थी दोन गणवेषासाठी ६०० रुपये याप्रमाणे १७ लाख ६४ हजार ६०० रुपये निधी मंजूर केला. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शालेय गणवेषाचा निधी वर्ग केला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांनी दिली.

NMC School Uniform
Nashik Political: भाजप, शिंदे की पवार गटाकडे नेतृत्व? बदलत्या राजकारणातून नाशिक लोकसभा मतदारसंघात पेच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com