SAKAL Impact News : उद्यानांच्या समस्यांच्या निराकरणास प्रारंभ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

work start

SAKAL Impact News : उद्यानांच्या समस्यांच्या निराकरणास प्रारंभ!

सिडको (जि. नाशिक) : ‘सकाळ’ च्या माध्यमातून सिडको परिसरातील विविध उद्यानांमधील समस्या मांडण्यात येत असून उद्यान विभाग व ठेकेदार यांच्या कामकाजाचा भोंगळ कारभार प्रसिद्ध करण्यात येत असून उद्यानांच्या दुरुस्तीसाठी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. (NMC Start solving problems of parks SAKAL Impact News)

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

हेही वाचा: LCBने 6 तासांत आवळला कारवाईचा फास; पोलिस अधिक्षकांनी केले बक्षिस जाहीर

उद्यानाच्या देखभालीसाठी विविध कंपन्यांना काम देण्यात आलेले असून उद्यानातील समस्या दिवसेंदिवस दिवस वाढत असल्याच्या मथळ्या खाली सकाळ मधून वृत्त प्रसारित झाल्याने सिडकोतील उद्याने स्वच्छ केली जात आहेत. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरातील रहिवासीयंमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

"आमच्या परिसरातील उद्यानाची अतिशय बिकट परिस्थिती झाली होती. मात्र आता येथील स्वच्छता सुरु झाली असून खेळणी दुरुस्ती करण्यात येत आहे."- संध्या येवले, गृहिणी

"उद्यानातील कचरा उद्यानात जळण्याचा प्रकार बंद झाला असल्याचे चित्र दिसून येत असून घंटागाडी चालक येथील कचरा घंटागडीत टाकताना दिसत असल्याने मनस्वी आनंद होत आहे."
- सोनाली आहेर, गृहिणी

हेही वाचा: Nashik News: येवला पोलिस निरीक्षक मथुरे यांची चौकशी; फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा

टॅग्स :NashiknmcGarden