NMC Tax Recovery: थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी 6 टप्प्यात वसुली

NMC Tax Recovery
NMC Tax Recoveryesakal
Updated on

NMC Tax Recovery : सवलत योजनेतून महापालिकेने घसघशीत कमाई केल्यानंतर आता थकबाकीचा बोजा कमी करण्यासाठी सहा टप्प्यात वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १४२५ थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या जाणार आहे. त्यांच्याकडून १७० कोटी रुपयांची थकीत घरपट्टी वसुलीची अपेक्षा आहे. (NMC Tax Recovery Recovery in 6 stages to reduce burden of arrears Nashik)

नाशिक महापालिकेला जीएसटी अनुदानापाठोपाठ घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. नियमित घरपट्टी वसूल करण्याबरोबरच थकबाकी वसुलीचेदेखील आव्हान महापालिकेसमोर असते. महापालिकेची जवळपास ४८५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

यामध्ये १८५ कोटी रुपयांची शास्तीची रक्कम आहे, मात्र असे असले तरी नियमानुसार ही वसुली करणे गरजेचे आहे. कर सवलतीच्या माध्यमातून महापालिकेला मागील तीन महिन्यात ९१ कोटी रुपये प्राप्त झाले.

आता थकबाकी वसुलीच्या माध्यमातून अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठता येणार आहे. त्यासाठी आर्थिक वर्षा अखेरपर्यंत अर्थात मार्च महिन्यापर्यंत सहा टप्पे आखण्यात आले आहे.

सर्वाधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांना प्रथम नोटीस बजावल्या जाणार असून त्यांच्याकडून वसुली केली जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Tax Recovery
Ajit Pawar NCP : अजित पवार-जयंत पाटील एकत्र येणार; उद्या होणारी 'ही' बैठक दोन्ही नेत्यांसाठी महत्त्वाची

थकबाकी वसुलीचे टप्पे

- पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यामध्ये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक घरपट्टी असलेल्या थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे. १४२५ एवढे थकबाकीदार आहे. १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडून १७० कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

- दुसरा टप्पा : एक लाख ते अडीच लाख रुपये थकबाकीदार असलेले २७९४ मिळकत धारक आहे. त्यांच्याकडून ४१ कोटी ९१ लाख ३० सप्टेंबरपर्यंत वसूल केले जाणार आहे.

- तिसरा टप्पा : २० हजार ते एक लाख रुपये थकबाकी असलेले ३५, ३५६ थकबाकीदार आहे. त्यांच्याकडून १३० कोटी ९० लाख रुपये थकबाकी वसूल होणे अपेक्षित आहे. त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे.

- चौथा टप्पा : पाच हजार ते वीस हजार रुपये थकबाकी असलेले एक लाख ५ हजार १३८ थकबाकीदार आहे. त्यांच्याकडून १०७ कोटी ३१ लाख वसुली होणे आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही वसुली केली जाईल.

- पाचवा टप्पा : दोन ते पाच हजार रुपये थकबाकी असलेले ८० हजार ९३४ थकबाकीदार आहे. त्यांच्याकडून २६ कोटी ४२ लाख रुपये वसुली अपेक्षित आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ही वसुली केली जाईल.

- सहावा टप्पा : दोन हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले ६० हजार २७ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडून आठ कोटी ८२ लाख रुपये थकबाकी वसुली केली जाणार आहे. त्यासाठी ३१ मार्च अंतिम मुदत राहील.

"थकबाकी वसुलीसाठी सहा टप्पे करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने थकबाकीदार करदात्यांनी महापालिकेला सहकार्य करावे अन्यथा कारवाई केली जाईल."

- श्रीकांत पवार, कर उपायुक्त, महापालिका.

NMC Tax Recovery
Nashik ZP Politics: शिवसेना- राष्ट्रवादीत वाढेल चुरस! जि. प. तील राजकीय समीकरणे बदलणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.