जुने नाशिक- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने भद्रकाली पोलिस ठाण्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात आमच्यावर गुन्हे दाखल करा. परंतु, डीजे वाजवण्यास परवानगी द्या. अशी मागणी बैठकीत उपस्थित मंडळाच्यातर्फे सुभाष शेजवळ यांनी केली. तर मिरवणुकीत डीजेचा वापर करू नये, अशा सक्त सूचना पोलिसांनी बैठकीत दिल्या.