चांदवड- चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दगू जाधव यांच्याविरोधात अठरापैकी बारा संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सत्ता स्थापन करताना ठरलेल्या समझोत्यानुसार त्यांनी राजीनामा न दिल्याने इतरांना संधीसाठी बारा संचालकांनी हे पाऊल उचलले आहे.