पंचवटी (नाशिक)- नाशिक कृषी बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंगळवारी (ता. ११) झालेल्या बैठकीत १५ संचालकांच्या मतदानाने मंजूर करण्यात आला. अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना मोठा धक्का मानला जात आहे. आता १९ मार्चला सकाळी अकराला होणाऱ्या बैठकीत नूतन सभापतींची निवड होईल. नवीन सभापती निवडीपर्यंत हंगामी सभापती म्हणून उपसभापती विनायक माळेकर यांची निवड करण्यात आली आहे.