esakal | ‘नीट’सह अन्य सामाईक परीक्षा स्थगितीचा केंद्राचा विचार नाही; डॉ. भारती पवारांची लोकसभेत ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

bharati pawar

‘नीट’सह अन्य सामाईक परीक्षा स्थगितीचा केंद्राचा विचार नाही

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : ‘नीट’ आणि इतर सामाईक प्रवेश परीक्षा स्थगित करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही. नीट, पदव्युत्तर ११ सप्टेंबरला, तर नीट पदवी परीक्षा १२ सप्टेंबरला घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. परीक्षा योग्य सावधगिरीने आणि कोरोनायोग्य वर्तनासह सर्व ‘प्रोटोकॉल'चे पालन करून घेण्यात येईल. परीक्षा सुरळीत व्हाव्यात, यासाठी उमेदवार आणि परीक्षा कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सुरक्षात्मक उपाय सुचवण्यात आले आहेत. उमेदवारांची गर्दी आणि लांबचा प्रवास टाळण्यासाठी देशातील परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. प्रवेशपत्रांसोबत कोरोना ई-पास देण्यात आला आहे. (no-plans-to-postpone-NEET-exam-said-minister-Bharati-Pawar-jpd93)

परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी योग्य स्वतंत्र व्यवस्था असेल. सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान आढळणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र वेगळ्या प्रयोगशाळेत परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल. उमेदवारांना फेस मास्कचा वापर अनिवार्य असेल. त्यांना फेस गिल्ड, फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर असलेले सेफ्टी किट देण्यात येईल. परीक्षा केंद्राबाहेर गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. कला आणि विज्ञानसंबंधी परीक्षांचे क्षेत्र संबंधित विद्यापीठे, राज्याकडे आहे.

हेही वाचा: Nashik weekend lockdown: काय म्हणाले छगन भुजबळ?

हेही वाचा: महाविद्यालयामध्ये १५ पर्यंत निवडणूक साक्षरता मंडळ

loading image
go to top