वैद्यकीय परीक्षांना स्थगिती नाहीच; याचिका फेटाळली

medical exam
medical examesakal

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे (Maharashtra University of Health Sciences) हिवाळी सत्र परीक्षा घेण्याच्‍या निर्णयाला विद्यार्थ्यांसह स्‍वयंसेवी संस्‍थांनी आव्‍हान दिले होते. याबाबतची याचिका मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. त्‍यामुळे गुरुवार (ता. १०)पासून या परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार आहेत. (no-postponement-of-medical-examinations-nashik-marathi-news)


गुरुवारपासून राज्‍यभरात वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा

न्‍यायालयाचा निकाल आल्‍यानंतर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी हा तपशील वैद्यकीय महाविद्यालयांच्‍या प्राचार्यांना कळविला आहे. यासंदर्भात सविस्‍तर पत्र पाठविले आहे. याचिकेत केंद्रीय आरोग्‍य मंत्रालय, केंदीय शिक्षण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासन, मेडिकल कमिशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ यांना प्रतिवादी केले होते. राज्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा पुढे ढकलाव्‍यात, अशी विनंती करणारी ही याचिका होती. शनिवारी (ता. ५) न्‍यायालयाने याचिका फेटाळताना विविध सूचना केल्‍या आहेत. यापूर्वी दोन टप्प्यांत परीक्षा झाल्‍या असून, ही तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा होते आहे. यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनाही विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्यासाठी साकडे घातले जात होते. मात्र, परीक्षा ठरलेल्‍या वेळापत्रकानुसारच होणार, असे देशमुख यांनी ट्विटरद्वारे स्‍पष्ट केले होते.

medical exam
मद्याच्या शोधात 'समृद्धी'ची वाहने गल्लीबोळांत

विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी

सर्व परीक्षार्थींनी आरटीपीसीआर चाचणी करून अहवाल निगेटिव्‍ह असल्‍याची खात्री परीक्षेपूर्वी करून घ्यावी. तसेच प्रवेशपत्रासोबत चाचणीचा निगेटिव्‍ह आलेला अहवाल परीक्षा केंद्रात सादर करावा. एखाद्या परीक्षार्थीकडे असा अहवाल नसेल, तर त्‍यास रॅपिड ॲन्टिजेन चाचणीच्‍या अहवालाच्‍या आधारे परीक्षेला बसता येईल. परंतु, पुढील पेपरला व १५ जूनपूर्वी अशा विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी लागेल. तसेच अहवाल पॉझिटिव्‍ह आलेल्‍या परीक्षार्थींबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्‍या कार्यप्रणालीचा (एसओपी) अवलंब करावा, अशा सूचना न्‍यायालयाने दिल्‍या आहेत.

medical exam
नाशिकमध्ये ३८० कोटींचे अनावश्यक भूसंपादन; कोणाचा आशीर्वाद?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com