Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray along with MNS Nashik city president Dilip Dater, state general secretary Ashok Murtadak, farmers along with Ratankumar Icham
Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray along with MNS Nashik city president Dilip Dater, state general secretary Ashok Murtadak, farmers along with Ratankumar Ichamesakal

Atul Save to Raj Thackeray: जिल्हा बॅंकतर्फे आता 3 महिने वसुली नाही; राज ठाकरे यांना मंत्री सावेंचे आश्वासन

Atul Save to Raj Thackeray : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कठोर वसुली विरोधात नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी मनसे अध्यक्ष राज्य ठाकरे यांची भेट घेत साकडे घातले.

त्यावर राज ठाकरे यांनी तात्काळ सहकारमंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधत फोनव्दारा चर्चा केली. यात, तीन महिने वसुली करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. (No recovery by District Bank for 3 months now Raj Thackerays assurance of minister atul save nashik news)

जिल्हा बँकेच्या सक्तीच्या आणि कठोर वसुलीच्या विरोधात मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे, विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश लासुरे, निफाड तालुका अध्यक्ष तुषार गांगुर्डे, नाशिक वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष निकतेशजी धाकराव यांच्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुणे येथे भेट घेतली.

बॅंकेच्या सक्तीच्या वसुली सुरू असून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बॅंकेचा बोजा चढविला जात असल्याचे शिष्टमंड़ळातर्फे सांगण्य़ात आले. राज ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन सहकारमंत्री अतुल सावे यांना दूरध्वनीवरून या प्रकरणात जिल्हा बँकेने केलेल्या गलथान कारभाराविषयी चर्चा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray along with MNS Nashik city president Dilip Dater, state general secretary Ashok Murtadak, farmers along with Ratankumar Icham
Politics: मविआ सोबत भाजपला धक्का! बडा नेता 'बीआरएस'च्या वाटेवर? केसीआर'यांची घेतली भेट

त्यानंतर सहकार मंत्री सावे यांनी तातडीने तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्हा बँकेची कार्यवाही थांबवली जाईल आणि त्या दरम्यान नाशिक जिल्हातील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.

यामुळे जिल्हयातील सर्व ६५ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्यावतीने ठाकरे यांचे आभार मानण्यात आले. शेतकऱ्यांतर्फे रावसाहेब आईतवडे, कैलास बोरसे, खेमराज कौर, दिलीप पाटील आदी उपस्थितीत होते.

Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray along with MNS Nashik city president Dilip Dater, state general secretary Ashok Murtadak, farmers along with Ratankumar Icham
Kolhapur Politics : 'परिस्थिती अत्यंत बिकट, कारखान्याची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com