सतपंथ शिष्यवृत्तीतून वंचितांचे भविष्य उज्ज्वल

सतपंथ शिष्यवृत्तीतून वंचितांचे भविष्य उज्ज्वल
Published on: 
ॲंकर शहर टुडे पान तीनसाठी NSK26H34285 जळगाव : ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाच्या निमित्ताने नोबेल फाउंडेशनच्या सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पातील विद्यार्थ्यांसोबत ज्ञानेश्वर महाराज. सोबत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, जयदीप पाटील आदी मान्यवर. ------ सतपंथ शिष्यवृत्तीतून वंचितांचे भविष्य उज्ज्वल ----- ज्ञानेश्वर देवाचार्य महाराज; ‘नोबेल दीपोत्सव’ उत्साहात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : समाजातील गरजू व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उज्ज्वल भविष्याची संधी उपलब्ध करून देणे, हे केवळ शैक्षणिक कार्य नसून, ती एक महान समाजसेवा आहे, असे प्रतिपादन सतपंथ प्रेरणापीठ, पिराणा येथील जगद्‌गुरु संत ज्ञानेश्वर देवाचार्य महाराज यांनी केले. येथील नोबेल फाउंडेशन संचालित सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘नोबेल दीपोत्सव’ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करीत हा उपक्रम देशातील इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले. या दीपोत्सव सोहळ्यास संत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, तुळशी हेल्थ केअर सेंटरचे डॉ. सचिन पाटील व नोबेल फाउंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दिवाळीच्या मंगलमय वातावरणात ज्ञान, संस्कार, सेवाभाव व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने आनंदात पार पडला. ---- पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी प्रशिक्षण जळगाव येथे कार्यरत असलेल्या सतपंथ शिष्यवृत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या ५०हून अधिक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी विनामूल्य निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जात आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जयदीप पाटील यांनी केले. रमेश पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी ग्लोबल मिशन स्कूलचे चेअरमन मनोहर पाटील, नोबेल फाउंडेशनचे संचालक राजेंद्र पाटील, प्रशांत आयडे, वीरेंद्र पवार, अहमदाबाद येथील चेतन पटेल, डॉ. संपदा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.