Nomokar Teerth
sakal
नाशिक: मालसाने (ता. चांदवड) येथे णमोकार तीर्थाच्या माध्यमातून जिल्ह्यात नवीन धार्मिक पर्यटन क्षेत्र विकसित होणार आहे. या तीर्थक्षेत्रावर वर्षभर भाविकांची वर्दळ असेल. त्यामुळे सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या धर्तीवर णमोकार तीर्थ महोत्सवाचे सूक्ष्म नियोजन करताना भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या.