नाशिक- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल मंगळवारी (ता. २२) जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या गौरव कायंदेपाटील, श्रुती चव्हाण, अक्षय पवार, स्मिता कातकाडे, राजू वाघ यांनी यश मिळवीत भारतीय प्रशासन सेवेत दाखल होण्याची स्वप्नपूर्ती केली आहे.