‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ची उत्तर महाराष्ट्राची निवडही बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MAHARASHTRA CHAMBER COMMERCE INDUSTRY

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ची उत्तर महाराष्ट्राची निवडही बिनविरोध

नाशिक : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरच्या निवडणूक प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर अखेरीस सामंजस्याने तोडगा काढत बिनविरोध निवडणुक करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष हेमंत राठी, नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सामंजस्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

नाशिकच्या कार्यकारिणी पदाच्या २१ जागांसाठी आजपर्यंत निवडणूक झाली नव्हती. याचा विचार करून कार्यकारिणी पदांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुधाकर देशमुख यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्याचा व सुनिता फाल्गुने यांना नाशिक शाखा अध्यक्षपदी, तर संजय सोनवणे यांना सह अध्यक्षपदी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: पुणे महानगरपालिका : उधळपट्टीचा निर्णय रद्द करा

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हेमंत गायकवाड, संदिप भंडारी यांनी महत्वाची भूमिका बजावली. कार्यकारीणी सदस्यपदी श्री. गायकवाड, कैलास आहेर, व्हिनस वाणी, संजय राठी, रवी जैन, रविंद्र झोपे, हेमंत कांकरिया, नेमिचंद कोचर, मनिष रावल, संजय महाजन, सचिन शहा, अंजु सिंघल, भावेश मानके, राजेश मालपुरे, डॉ. मिथिला कापडणीस, स्वप्निल जैन, दत्ता भालेराव, राजाराम सांगळे, सचिन जाधव, मिलिंद राजपूत, प्रशांत जोशी यांना कार्यकारिणी समितीवर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढील काळात राज्यातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व महाराष्ट्र चेंबरच्या विकासासाठी सामूहिकपणे कार्यरत राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गांधी यांनी सांगितले.

loading image
go to top