Factory Pollution : जानेवारीतच नोटीस, तरीही कारवाई का नाही? मुरमुरा कारखान्याचे प्रदूषण

water pollution
water pollutionsakal

Factory Pollution : वणी- सापुतारा रस्त्यावरील मुरमुरा कारखाना बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारीकडे त्रस्त शेतकरी व व्यापारींनी करण्यापूर्वीच १२ जानेवारीला आरोग्यविभागाने मुरमुरा कारखान्याला नोटीस दिल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे पुढे कारवाई का झाली नाही असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. मुळात आरोग्य विभागाने दिलेल्या पत्राकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष का केले, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? निदान आतातरी ग्रामपंचायत कारवाई करणार का अशी चर्चा आता शेतकरी आणि नागरिक करू लागले आहेत. (Notice in January still no action Murmura factory pollution at lakhmapur nashik news)

१० जानेवारी २३ ला सदर मुरमुरा कारखान्याचे दर्पयुक्त दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधे हे पाणी उतरले होते. त्यावेळी हातापाया पडून पुन्हा असे होणार नाही अशी ग्वाही मुरमुरा कारखानदाराने दिली व संबंधितांनीही त्याकडे तेवढ्या गांभिर्याने पाहिले नाही.

त्यावेळी पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. एस. साबळे यांनी त्याची दखल घेतली होती. डॉ. साबळे, आर. पी. गांगुर्डे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कारखान्याभोवती असलेले ओपन ड्रेनेजमध्ये अळ्या आढळल्याने परिसरात डेंगी, चिकनगुणिया या रोगांची साथ उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली होती.

योग्य नियोजन करून ड्रेनेजद्वारे विल्हेवाट लावण्याबाबत सूचित केल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. पाइपलाइनचे लिकेज तत्काळ बंद करण्याबाबत तंबीही दिली तसेच परिसरात दुर्गंधी पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल असे स्पष्टपणे लेखीस्वरुपात सूचित केले आहे.

विशेष बाब म्हणजे ग्रामविकास अधिकारी, सरपंच, तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका गटविकास अधिकारी यांना या नोटीसची प्रत कार्यालयीन माहितीसाठी देण्यात आलेली आहे. तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी आता लोटला आहे.

केवळ कागदी घोडे नाचवत कारवाईचा आव आणून पर्यावरणाचा ऱ्हास करून शेती व्यवसाय धोक्यात आणणाऱ्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या मुरमुरा कारखान्याला नेमका आशीर्वाद कोणाचा याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.

एका शेतकऱ्याच्या निर्यातक्षम द्राक्षबागेला याचा फटका बसून आर्थिक हानी झाली आहे. उग्रदर्प व दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात याची दखल न घेणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शेतकरी करीत आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

water pollution
Gopinath Munde Accident Insurance : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना आता मिळेल थेट अनुदान!

निर्यातक्षम द्राक्षबाग तोडण्याची वेळ

वणी सापुतारा रस्त्यावरील मुरमुरा कारखान्याच्या दूषित पाण्याचा फटका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक सचिन पवार यांना बसला. मुरमुरा तयार करण्याच्या प्रक्रियेनंतरचे उघड्यावर सोडलेले दूषित पाणी विहीर व बोअरवेलमधे उतरले.

हे दूषित पाणी द्राक्ष बागांना वापरावे लागले तसेच बॉयलरमधून निघणारा दर्पयुक्त धूर द्राक्षांवर पडला, त्यामुळे द्राक्षांवर काजळी पडली. द्राक्षाचा रंग बदलला. त्यामुळे साठ रुपये असा ठरलेला दर काजळीयुक्त द्राक्ष पाहून व्यापाऱ्याने अवघ्या पंधरा रुपयांनी घेतले.

त्यामुळे सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे कर्जात दबण्यापेक्षा चार एकर द्राक्ष बाग तोडून टाकली आहे. कारखान्यावर कारवाई करावी, तो कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा आमच्या जमिनी बाजारभावानुसार त्या कारखानदाराने घ्याव्यात असे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक सचिन पवार यांनी म्हटले आहे.

"माझ्या शेतजमिनीत टोमॕटो व कांदा उत्पादन होते, मात्र मुरमुरा कारखान्याच्या दूषित पाणी व आगसदृश्‍य धुरामुळे या पिकांचे नुकसान झाले आहे प्रशासनाने मुरमुरा कारखानदाराला पाठीशी न घालता त्वरित कारवाई करावी." - हर्षल जाधव,शेतकरी, वणी

"माझे कांद्याचे शेड व कांद्याच्या चाळी आहेत. मुरमुरा कारखान्यातून सोडण्यात येत असलेले दूषित पाण्याच्या उग्र वासामुळे येथे व्यवसाय करणे अवघड झाले आहे. शेडला लावलेली नेट धूर व काजळीमुळे क्षतिग्रस्त झाली आहे. श्‍वासोच्छवासाला येथे त्रास होत असून मजूरही कामास येण्यास धजावत नाहीत."

- गणेश लुंकड, सुरेश लुंकड, कांदा व्यापारी, वणी

water pollution
Niphad Sub District Hospital : निफाडचे उपजिल्हा रूग्णालय आता 100 खाटांचे! दिलीप बनकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com