सिन्नर- सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली परिसरातील तीन बिअर शॉपीत चोरी करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. हसन हमजा कुट्टी (४५, रा नवनाथनगर, शेवाळे चाळ, पंचवटी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र व अन्य राज्यात ३० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली.