नामपूर- राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे ग्रामीण भागात सामाजिक योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) कार्यरत स्वयंसेवकांची नागरी संरक्षणयोद्धा म्हणून नावनोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘माय भारत’ संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत केवळ सामाजिक क्षेत्रात, आपत्ती निवारणामध्ये योगदान देणाऱ्या ‘एनएसएस’ स्वयंसेवकांना आता नागरी संरक्षण दलाच्या क्षेत्रात सामावून घेतले जाणार आहे.