नाशिक जिल्ह्यातील CORONA ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्या 700 पार

नाशिक जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्‍याने वाढते आहे.
corona update nashik
corona update nashik esakal
Updated on

नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या सातत्‍याने वाढते आहे. तुलनेत कोरोनामुक्त रुग्णसंख्या कमी राहात असल्‍याने सक्रीय रुग्णसंख्येत सातत्‍याने वाढ सुरु आहे. रविवारी (ता.१७) हा आकडा सातशेपार गेला आहे. दिवसभरात १०३ रुग्‍णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले तर ५९ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांमध्ये ४४ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत उपचार घेणाऱ्या कोरोना (Corona) बाधितांची संख्या ७०९ झालेली आहे. (Nashik District Corona Updates)

corona update nashik
Corona : आज राज्यात 2186 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

रविवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील ४४, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील पन्नास रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रातील पाच व जिल्‍हा बाहेरील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्‍या ७०९ बाधितांपैकी सर्वाधिक ३४० बाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक शहरातील ३०९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील ३९, तर जिल्‍हा बाहेरील २१ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. रविवारी जिल्‍ह्‍याचा पॉझिटिव्‍हीटी दर ३.७७ टक्‍के राहिला. तर नाशिक महापालिका क्षेत्रासाठी हा दर ५.८९ टक्‍के राहिला. सायंकाळी उशिरापर्यंत अवघे नऊ अहवाल प्रलंबित होते. हे सर्व प्रलंबित अहवाल नाशिक महापालिका क्षेत्रातील होते. (Latest Marathi News)

corona update nashik
मास्क हटले, आजार वाढले!

सात बाधितांमध्येच लक्षणे

सध्या उपचार घेणाऱ्या ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या सातशेहून अधिक झालेली आहे. असे असले तरी अवघ्या सात बाधितांमध्ये कोरोनाविषयक लक्षणे आढळून आलेली आहेत. उर्वरित ७०२ बाधितांमध्ये लक्षणे नसल्‍याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. उपचार घेणार्यांपैकी एकाही बाधितांला उपचारात ऑक्‍सिजन किंवा व्‍हेंटीलेटरची आवश्‍यकता नसल्‍याने काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com