Dengue Disease : शहरात डेंगी रुग्णांची संख्या 400च्या घरात

Dengue Disease News
Dengue Disease Newsesakal

नाशिक : परतीच्या पावसाने शहरात धुमाकूळ घातला असताना ऐन दिवाळीच्या कालावधीमध्ये देणगीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात ७३ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे डेंगी बाधितांचा आकडा चारशेच्या वर पोचला आहे. (number of dengue patients in city is around 400 Nashik Latest Marathi News)

Dengue Disease News
NMC News : थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल; सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी कर वसुली

ऑगस्ट महिन्यामध्ये बँकेचे ९९ रुग्ण आढळून आले होते. सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या वाढून १३९ रुग्ण संख्या झाली होती. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात ७३ नवीन डेंगी बाधित रुग्ण आढळून आले आहे. एकूण रुग्णांपैकी पंचवटी विभागामध्ये सर्वाधिक ११३ रुग्ण आढळले, तर पूर्व विभागात ५५ रुग्ण आढळून आले. सातपूर विभागात ५४ डेंगीचे रुग्ण आढळून आले असून, नाशिक रोड व सिडको विभागात प्रत्येकी ६९ रुग्ण आढळून आले आहेत. डेंगी पाठोपाठ चिकूनगुनियाचे सर्वाधिक २८ रुग्ण आढळून आले आहेत.

Dengue Disease News
Chain Snatching : राजरोसपणे सौभाग्यचंलेणे ओरबाडणे सुरूच; पोलिसांचे मात्र हातावर हात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com