सेवा संकल्प अभियान

सेवा संकल्प अभियान
Published on: 
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी... -- फोटो क्रमांक : 31719 मुकटी (ता. धुळे) : येथील पोषण मेळाव्यात महिला व बाल विकास विभागांतर्गत झालेल्या पौष्टिक पाककृती प्रदर्शनाची पाहणी करताना आमदार राम भदाणे. शेजारी अधिकारी, मान्यवर. -- कुपोषणमुक्त तालुक्यासाठी अविरत प्रयत्न करा -- राम भदाणे : मुकटी येथे पोषण माह व सेवा संकल्प अभियान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : अंगणवाडीमध्ये मिळणारा गरम शिजवलेला आहार बालकांच्या सुदृढ आरोग्याचा पाया आहे. माता आणि बालकांचे आरोग्य हे समृद्ध समाजाचे अधिष्ठान आहे. कुपोषणमुक्त व सुदृढ धुळे तालुका घडवण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार राम भदाणे यांनी केले. - मुकटी (ता. धुळे) येथे पोषण माह २०२६ व सेवा संकल्प अभियान अंतर्गत महिला व बाल विकास विभाग प्रकल्प धुळे- तीनच्या वतीने झालेल्या प्रकल्पस्तरीय पोषण मेळाव्याचे उद्घाटन भदाणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोळ, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज भदाणे, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) सुजाता बोरसे, वैद्यकीय अधिकारी सुशांत गवांदे उपस्थित होते. - महिला व बाल विकास विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. यावेळी पोषणविषयक थीमवर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, पौष्टिक पाककृती प्रदर्शन आणि ‘आरंभ- सुरुवातीचे क्षण मोलाचे’ या संकल्पनेवरील स्टॉल्सची पाहणी करत उपस्थितांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमात लेक लाडकी योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण करण्यात आले. बालकांचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करून बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले व उत्कृष्ट लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रोहिदास पाटील, माजी सरपंच हरी मराठे, अंचाळेचे माजी सरपंच चुनीलाल पाटील, काळखेडेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, भिरडाईचे पोलिस पाटील नंदकिशोर पाटील, अधिकार पाटील, पारस पाटील (अजंग), माजी सरपंच शरद पाटील, विष्णू पाटील, सुरक्षा देवरे, कल्पनाबाई पाटील, किरण पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com