nylon manja accident
sakal
जुने नाशिक: वडाळा नाका परिसरातील उड्डाणपुलावर अडकलेल्या नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. ३१) सायंकाळी घडली. या अपघातात प्रकाश भीमाजी सोमाशे (वय ४८) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मुंबई नाका येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नायलॉन मांजाचा जीवघेणा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.